Menu Close

भारताने आश्रय नाकारलेल्या ५०० हिंदूंचे पाकमध्ये बळजोरीने धर्मांतर !

  • पाकमधील हिंदूंप्रती कमालीची असंवेदनशीलता असणारे भारत सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूहित काय साधणार ?
  • कोट्यवधी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान यांना सामावून घेणारे; मात्र पाकमधील अत्याचारग्रस्त हिंदूंना आश्रय न देणारे सरकार, प्रशासन आणि सुरक्षायंत्रणा हिंदु राष्ट्राची आवश्यकता अपरिहार्य बनवतात ! – दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद : पाकच्या सिंध प्रांतातील मातली जिल्ह्यात २५ मार्च या दिवशी ५०० हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.  यांतील बहुतेक जण भारतात आश्रयासाठी आले होते; मात्र सरकारने त्यांना दीर्घकालीन व्हिसा न दिल्याने ते पाकमध्ये परतले होते. पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सैन्यप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्या ‘ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग’च्या पदाधिकार्‍यांनी धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी हिंदु कुटुंबातील ५०० जणांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर जिवाच्या भीतीने या सर्वांनी इस्लाम स्वीकारला.

या धर्मांतराच्या कार्यक्रमासाठी ५०० हिंदूंना एका मंडपात आणण्यात आले. त्यानंतर कलमा वाचण्यात आला आणि हिंदूंनाही तो उच्चारण्यास सांगण्यात आला. मग या सर्व हिंदूंचे इस्लाम धर्मात स्वागत करण्यात आले.

पुन्हा पाकमध्ये परतलेल्या हिंदूंना लक्ष्य !

जे हिंदू पाकिस्तान सोडून भारतात आले होते; परंतु केंद्रीय अन्वेषण विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी त्यांच्या वास्तव्यास आडकाठी आणली. त्यामुळे त्यांना पुन्हा पाकमध्ये जावे लागले. अशा कुटुंबांना तेथील इस्लामी नागरिक लक्ष्य करत आहेत. मागील ३ वर्षांत भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या १ सहस्र ३७९ हिंदूंना पाकमध्ये जावे लागले. त्यांतील ५०० जणांचे धर्मांतर करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *