फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचा प्रश्न
हिंदु देवतांचा अवमान करणार्या अमीर खान यांना एक विदेशी पत्रकार वस्तूनिष्ठ प्रश्न विचारू शकतो; मात्र हिंदुबहुल देशातील हिंदूच स्वधर्माविषयी जागृत नसल्याने त्यांना स्वतःच्या श्रद्धास्थानांवर टीका करणार्यांविषयी काहीच न वाटणे लज्जास्पद !
मुंबई : अभिनेता आणि निर्माता अमीर खान ‘महाभारता’वर आधारित चित्रपट साकारत असून त्यात तो श्रीकृष्णाची भूमिका साकारत असल्याचे म्हटले जात आहे. याच गोष्टीवरून फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?, पुरोगामी विचारांच्या नावाखाली मोदी यांच्या भाजपचीही विचारसरणी काँग्रेसप्रमाणेच होत आहे ?, महंमद पैगंबर यांच्या आयुष्यावर साकारणार्या चित्रपटात मुसलमान कोणा हिंदु कलाकाराला भूमिका साकारण्याची अनुमती देतील ?’, असे प्रश्न उपस्थित केले. (पैसे आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी वारंवार हिंदूंच्या देवतांचा उपयोग करणार्या अमीर खान यांचा ‘दुटप्पी’पणा जाणा ! ‘पीके’सारख्या चित्रपटांतून हिंदूंच्या देवता आणि मंदिरे यांचा जाणीवपूर्वक अश्लाघ्यपणे अवमान करणार्या या हिंदुद्वेष्ट्या अभिनेत्याच्या (?) या भूमिकेस हिंदूंनी सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
Why should @AamirKhan, a Muslim, play in most ancient & sacred of Hindu epics, the Mahabharata? Is @BJP4India Govt of @narendramodi going to be like the @INCIndia & just stand by in name of secularism??? Would Muslims allow a Hindu to play life of Mohamed?https://t.co/fC7bvbHkZE
— Francois Gautier (@fgautier26) March 21, 2018
१. गोतिए यांच्या प्रश्नावर गीतकार जावेद अख्तर यांनी ‘ट्विटर’ या सामाजिक माध्यमावर प्रत्युत्तर म्हणून ‘बेशिस्त माणसा.. फ्रान्समध्ये या महाकाव्यावर आधारित पीटर ब्रुक्सच्या निर्मितीत साकारलेली कलाकृती तू पाहिली नाही का ? आमच्या देशात असे विकृत विचार पसरवण्यासाठी कोणती विदेशी संस्था (एजन्सी) पैसे देते ?, हे मला माहिती करून घ्यायचे आहे’, अशा भाषेत उत्तर दिले. (हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या अभिनेत्यास (?) एका हिंदु धर्मप्रेमी पत्रकाराने परखड प्रश्न विचारल्यावर अख्तर यांचे पित्त का खवळावे ? एका पत्रकाराला एकेरी संबोधून अख्तर यांनी त्यांची संस्कृतीच दाखवून दिली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. गोतिए यांच्या ‘ट्विट’वर टीका (ट्रोल) करणार्यांना त्यांनी (गोतिए यांनी) चोख प्रत्युत्तर देतांना म्हटले की, अमीरने श्रीकृष्णाची भूमिका साकारण्यावर मी आक्षेप घेतला, तर अनेक हिंदूंनी माझ्यावर टीका केली. (धर्माभिमानशून्य हिंदूच असे करू शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाश्चिमात्य देशांमध्ये एखादा मुसलमान व्यक्ती येशू ख्रिस्ताची भूमिका साकारू शकणार का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात