Menu Close

कारागृहातील कैद्यांनी प्रसाद बनवला, तर त्यांनाही शांती मिळेल : तृप्ती देसाई यांची बौद्धिक दिवाळखोरी

ढोंगी तृप्ती देसाई यांना कारागृहातील कैद्यांची नव्हे, तर स्वतःच्या प्रसिद्धीची काळजी आहे !

पुणे : कळंबा कारागृहातील महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसाठी प्रसादाचे लाडू बनवण्याचा तेथील जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव ठेवला आहे. कारागृहात गांजा सापडल्याचे कारण देत काही संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. खरे तर गांजाचा आणि लाडूचा काय संबंध ? (ज्या ठिकाणी गांजा सापडतो, त्या ठिकाणचे पावित्र्य ते काय असणार ? साधी देवपूजा जरी करायची असेल, तरी शुचिर्भूतपणाला महत्त्व दिले जाते. इथे तर शक्तीपिठाच्या देवीचा प्रसाद बनवण्याचे सूत्र आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तेथील महिला कैद्यांनी प्रसाद बनवला, तर त्यांना शांती मिळेल. कैद्यांना चांगले काम मिळाले, तर समाजात चांगला संदेश जाईल, अशा शब्दांत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी (कैद्यांना अन्य कोणतेही चांगले काम देऊ शकतो. धर्मविषयक ज्ञान नसणार्‍या व्यक्तीने धर्मविषयक निर्णय चांगले कि वाईट यासंदर्भात सल्ले देणे हास्यास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

भूमाता ब्रिगेडच्या वतीने आम्ही या प्रस्तावाचे स्वागत केले असून याची कार्यवाही करावी, यासाठीचे पत्रही पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले आहे, असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले. सलाम पुणे या संस्थेच्या वतीने १ मार्च या दिवशी तृप्ती देसाईंसह विश्‍वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी यांना पुरस्कार देण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

तृप्ती देसाई म्हणतात,

१. मुख्यमंत्र्यांनी शनिशिंगणापूर संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसून काही संघटनांमुळे त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. (सोंग मुख्यमंत्र्यांनी नाही, तर तृप्ती देसाई यांनी कथित सुधारणावादाचे घेतले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. भूमाता ब्रिगेड देवा-धर्माच्या विरोधात नाही, तर घटनेने दिलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या सूत्रासंदर्भात आंदोलन उभे केले आहे. (पाश्‍चात्त्य विचारसरणीतून आलेली बेगडी स्त्री-पुरुष समानता हिंदूच्या देवा-धर्माच्या विरोधात जात आहे, त्याचे काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

विश्‍वंभर चौधरी म्हणाले,

१. या देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद रहाणार कि घटनात्मक राष्ट्रवाद, हा सध्याचा खरा प्रश्‍न आहे. आक्रोशाला विद्रोह आणि विद्रोहाला राष्ट्रद्रोह समजला जाणे, ही शोकांतिका आहे. पूर्वीचे राज्यकर्ते केवळ भ्रष्ट होते; पण आता आपल्याला भ्रष्ट आणि जातीयवादी राज्यकर्ते लाभले आहेत. (चौधरी यांची वक्तव्ये म्हणजे हिंदुद्वेषातून आलेले उमाळे आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. राजा राममोहन रॉय आणि प्रगत इंग्रज शासन नसते, तर मूर्खपणाच्या परंपरा चालू राहिल्या असत्या. घटनेने कुठल्याही प्रथा, परंपरा यांच्याशी नाही, तर विज्ञानाशी नाळ सांगितली आहे. आपल्याकडे धर्माने एवढे डोके व्यापले आहे की, विज्ञानाला त्यात अवकाशच नाही. (इंग्रजांच्या गुलामीला प्रगत शासन म्हणणारे चौधरी ! प्रथा परंपरा यांवर एकांगी टीका करणार्‍या चौधरींनी धर्म आणि अध्यात्म जाणून घेण्याचा विवेक दाखवला तर धर्म विज्ञाला व्यापून उरला आहे, हे त्यांना कळेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हिंदुद्वेषी कुमार सप्तर्षी यांची हिंदुत्ववादी आणि ब्राह्मण यांच्याविरोधात गरळओक !

कुमार सप्तर्षी म्हणाले, हिंदुत्ववादी आणि ब्राह्मण पिसाळलेले आहेत. या लोकांना लोकशाही नको, तर वेदशाही हवी आहे (ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी असुरांना चांगले रामराज्य नको होते, तसेच आताही सर्वकल्याणकारी रामराज्याची अथवा हिंदु राष्ट्राची संकल्पना काहींना सहन होत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *