असे केवळ हिंदु संतच म्हणतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू : मी कारागृहात असतांना मला वाटायचे की, तेथील अमानवी छळामुळे मी जिवत राहू शकणार नाही. मनात एकच विचार असायचा की, मला मृत्यू आला, तरी हरकत नाही; मात्र मी पुन्हा त्याच उद्देशाने (हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी) पुन्हा जन्म घेईन. कितीही जन्म झाले, तरी माझे राष्ट्ररक्षण हे एकच ध्येय राहील, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्वनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची बेंगळुरू येथे सदिच्छा भेट घेतली, त्या वेळी त्यांनी वरील उद्गार काढले.
या भेटीच्या वेळी साध्वीजींनी कारागृहात असतांना अमानवी छळामुळे होणार्या शारीरिक वेदना कशा सहन केल्या, तसेच त्या सहन करतांना ईश्वराने त्यांना कसे साहाय्य केले, याविषयी सांगितले. या वेळी समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद, श्री. श्रीकांत, श्री. नवीन, श्रीमती अश्विनी प्रभु आणि कु. रश्मी उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात