नागपूर : येथील श्रीराम मंदिर, रामनगर येथून श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग होता. शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते श्रीरामाचा जप करत होते. शोभायात्रेत श्रीरामांच्या पालखीतील पादुकांचे पूजन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनानंतर डी.जे.चा आवाज न्यून केला !
शोभायात्रेच्या वेळी एका ठिकाणी मोठ्या आवाजात डी.जे.वर एका गणेश मंडळाने देवाचे गीत लावले होते; परंतु त्याचा आवाज पुष्कळ मोठा होता. त्याच्या तालावर काही जण विचित्र हावभाव करत नाचत होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन केल्यावर त्यांनी आवाज अल्प केला आणि गीतही पालटले. या वेळी सनातन संस्थेच्या बालसाधकांनीही ‘शोभायात्रेत डी.जे. लावायला नको’, असे नंतर सांगितले.
क्षणचित्र : साधक करत असलेला श्रीारामाचा जप ऐकून शोभायात्रा पहाण्यासाठी आलेले लोकही नामजप करत होते.