इंदूर (तेलंगण) : श्रीरामनवमीच्या निमित्ताने २३ आणि २४ मार्च या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात ब्रह्मश्री चागंटी कोटेश्वर राव यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. साईनाथ आणिश्री. नेला सुबोध यांनी ब्रह्मश्री राव यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच त्यांना ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ आणि ‘सनातन पंचांग २०१८’ भेट दिले. ब्रह्मश्री चागंटी कोटेश्वर राव हे आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांमधील प्रसिद्ध प्रवचनकार असून वर्ष २०१६ मध्ये आंध्रप्रदेश सरकारने त्यांना सांस्कृतिक मार्गदर्शक या पदावर नियुक्त केले होते.
हिंदु जनजागृती समितीकडून ब्रह्मश्री चागंटी कोटेश्वर राव यांची भेट
Tags : Hindu Janajagruti Samiti