Menu Close

नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर ६ जिल्ह्यांमध्ये हिंसा

उघडपणे हिंसा करणार्‍या धर्मांधांना रोखू न शकणारे सरकार आतंकवाद्यांना कधी रोखू शकेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

धर्मांधांचा उद्दामपणा जाणा ! केंद्रात आणि बिहार राज्यात हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असतांनाही त्यांना हिंदूंवरील आघात रोखता न येणे खेदजनक ! यास्तव हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पाटलीपुत्र (पाटणा) : श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर आणि समस्तीपूर येथे उसळलेल्या दंगलींचे लोण आता नवादापर्यंत पोहोचले आहे. ३० मार्च या दिवशी सकाळी काही धर्मांधांनी नवादा येथील गोंदापूर चौकाजवळ असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेनंतर नवादा येथे दंगल उसळली. संतप्त जमावाने पाटणा-रांची महामार्ग क्र. ३१ रोखून धरला, काही दुकानेही पेटवून दिली, तसेच वाहनांच्या काचाही फोडल्या. यानंतर दोन गटांत झटापट झाली. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींचे संतप्त जमावाकडून कॅमेरे फोडण्यात आले. संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

घटनास्थळी शीघ्र कृती दलालाही पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेची चेतावणी दिली. शहरातील सर्व मुख्य धार्मिकस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून अफवा पसरू नये, यासाठी नवादा येथील ‘इंटरनेट’ सेवा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आली.

६ जिल्ह्यांत हिंसा

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर बिहार राज्यातील दंगलीचा आगडोंब आता ६ जिल्ह्यांत पसरला आहे. यातील अनेक जिल्ह्यांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. गेल्या ४ दिवसांत औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर, समस्तीपूर आणि आररिया येथील कायदा आणि सुव्यस्थेची स्थिती बिघडली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *