Menu Close

गोरेगाव (मुंबई) येथे शिवसैनिकांनी भिंतींवरील टाईल्सद्वारे होणारी देवतांची विटंबना रोखली

असे धर्माभिमानी सर्वत्र हवेत !

मुंबई : शिवसेनेच्या युवासेनेने २८ मार्च या दिवशी गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम शॉपिंग सेंटरच्या भिंतीवरील टाईल्सवर असलेल्या देवतांच्या चित्रांमुळेे होणारी विटंबना रोखली. शॉपिंग सेंटरच्या भिंतींवर देवतांची चित्रे असलेल्या टाईल्स लावल्या होत्या. येणारे-जाणारे त्या टाईल्सवर थुंकत होते. ही गोष्ट धर्माभिमानी सर्वश्री सुबोध हत्तरकी, शंकर कदम, नरेश भोसले यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याविषयी युवासेनेचे शाखाधिकारी श्री. सुदेश खेडेकर यांना कळवले. त्या सर्वांनी गोकुळधाम शॉपिंग सेंटरचे सेक्रेटरी शेणॉय यांची भेट घेऊन टाईल्सद्वारे होत असलेला देवतांचा अवमान त्यांच्या लक्षात आणून दिला. प्रथम शेणॉय यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन याकडे दुर्लक्ष केले; मात्र श्री. सुदेश खेडेकर आणि अन्य कार्यकर्ते यांनी शेणॉय यांना समजेल अशा भाषेत समज दिली आणि त्यांच्याकडून स्वतः टाईल्स काढून घेतल्या. (देवतांची विटंबना रोखणारे आणि त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे शिवसैनिक हिंदूंसाठी आधार आहेत. असा धर्माभिमान समस्त हिंदूंमध्ये निर्माण झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही ! – संपादक)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *