Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

त्रिभुवन विद्यापिठातील संस्कृत विभागाचे प्रमुख श्री. नारायण प्रसाद गौतम यांची भेट

श्री. नारायण प्रसाद गौतम (डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्मांतरावर धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे ! – सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील त्रिभुवन विद्यापिठातील संस्कृत विभागाचे प्रमुख श्री. नारायण प्रसाद गौतम यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘धर्म अन् संस्कृती यांना राजाश्रय आवश्यक आहे. समाजाला धर्मशिक्षण देणे, हाच धर्मांतर थांबवण्याचा प्रभावी उपाय आहे. आपण धर्मांतर करणार्‍यांचा खरा इतिहास अभ्यासून तो जगापुढे ठेवला पाहिजे आणि त्यांच्या बोलण्यात अन् करण्यात किती अंतर आहे, हेही लोकांसमोर उघड केले पाहिजे.’’

श्री. नारायण प्रसाद म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये ख्रिस्त्यांचा हस्तक्षेप चालू झाला. तेव्हापासून संस्कृत भाषेचे महत्त्व अल्प होत गेले आणि प्रत्येक जण विज्ञानाचा अभ्यास करू पहात आहे. नेपाळचे राजकारण स्वछंदी झाले आहे.’’ या वेळी प्राध्यापक उमेश आचार्य हेही उपस्थित होते.

क्षणचित्र

१. श्री. गौतम यांनी समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी ४ ते ५ मासांनी वाहून घेण्याचा निश्‍चय केला.

२. श्री. गौतम यांनी विद्यापिठातील प्राध्यापकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याविषयी स्वत:हून विचारणा केली.

‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष रामेश्‍वर धेताल यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी भेट

काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘हिंदु जागरण नेपाळ’चे उपाध्यक्ष श्री. रामेश्‍वर धेताल यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरू (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना धर्मशिक्षणाचे महत्त्व विशद केले. ख्रिस्ती चर्चमध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांची माहिती दिली. ‘आपणही ख्रिस्ती प्रचारकांचे विचार बौद्धिक स्तरावर खोडून काढले पाहिजे. याकरता हिंदूंना धर्मशिक्षण आणि प्रशिक्षण देणे आवश्यक आहे’, असे सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी या वेळी सांगितले. या वेळी उपस्थितांनी त्यांच्या विविध शंकांचे शंकानिरसन करून घेतले. श्री. धेताल यांनी स्वत: या भेटीचे आयोजन केले होते.

‘न्यूज २४’ वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी वार्तालाप

मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

काठमांडू : मनुष्याने त्याच्या बुद्धीचा उपयोग विज्ञानासाठी केला, तर विज्ञानाचा उत्कर्ष होईल; परंतु मनुष्याने त्याची बुद्धी अध्यात्माला समर्पित केली, तर त्याचा उत्कर्ष होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. सद्गुरु (डॉ.) पिंगळे नेपाळ दौर्‍यावर असतांना  ‘न्यूज २४’ या वाहिनीचे निवेदक श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘मनुष्याने सनातन धर्माच्या आचार-विचारांचे पालन केले, तर अयोग्य अशा रज-तम विचारांपासून त्याचे रक्षण होऊन तो सत्त्वगुणी व्यवस्थेकडे अग्रेसर होतो’, असे शास्त्र सांगते. यासाठीच सनातन संस्थेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेले ३०० हून अधिक ग्रंथ विविध भाषांमध्ये प्रकाशित केले आहेत. यात हिंदु धर्माशी संबंधित अनेक प्रश्‍नांची उत्तरे असल्यामुळे समाज सनातनशी जोडला जात आहे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *