Menu Close

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘हुतात्मादिन फेरी’मध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांंच्या वतीने येथे ‘हुतात्मादिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने येथील शालीमार गार्डन ते ‘बी’ ब्लॉक पार्क पर्यंत ‘हुतात्मादिन फेरी’ काढण्यात आली. या वेळी ‘बी’ ब्लॉक पार्क या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांची माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्रे

१. गाझियाबाद येथील श्री. नंदकिशोर यांनी हे प्रदर्शन लावण्यासाठी समितीला आमंत्रित केले होते. श्री. नंदकिशोर फेसबुकच्या माध्यमातून सर्वप्रथम समितीच्या संपर्कात आले होते.

२. या वेळी काही जिज्ञासू महिला म्हणाल्या की, हे प्रदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे. हे प्रदर्शन या ठिकाणी अनेक दिवस लावण्यात यावे. प्रदर्शन पहाण्यासाठी आम्ही आमच्या मुलांना नक्की घेऊन येऊ.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *