Menu Close

नोएडा येथे झालेल्या धर्मसभेत हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन

नोएडा, गौतम बुद्धनगर (उत्तरप्रदेश) : हिंदु जनजागृती समिती आणि एस्एन् कल्याण समाज समिती यांनी संयुक्तपणे २३ मार्च या दिवशी झालेल्या हुतात्मादिनाच्या निमित्ताने येथे एका धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी ‘शौर्य जागरण’ या विषयावर, कु. कृतिका खत्री यांनी ‘जीवनात साधनेची आवश्यकता’ आणि सौ. संदीप कौर मुंजाल यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. सभेच्या ठिकाणी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांविषयी फलक प्रदर्शन, तसेच अध्यात्म अन् धर्मशिक्षण या विषयांवर ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

२. या वेळी एस्एन् कल्याण समाज समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दुबे म्हणाले की, फलक प्रदर्शन लावल्यानंतर वातावरणात शांतीचा अनुभव येत आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *