साधना, हिंदूसंघटन आणि हिदु राष्ट्राची स्थापना यांविषयी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे मार्गदर्शन
नगरकोइल (तमिळनाडू) : येथील श्री भगवती अम्मा मंदिरात १० दिवस चाललेल्या मसिकोडाई उत्सवात हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या उत्सवात हेंदवा सेवा संगम या संघटनेने ‘हिंदु धार्मिक बैठक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. यावेळी समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘साधनेचे महत्त्व’, ‘हिंदूसंघटन’ आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांविषयी मार्गदर्शन केले. तमिळनाडू शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् यांनी ‘स्वामी विवेकानंद आणि हिंदु राष्ट्र’ याविषयी आपले विचार व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी तमिळ भाषेतील सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्राची स्थापना इत्यादी विषयांवरील फलक लावण्यात आले होते.
२. कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने आयोजन समितीच्या अध्यक्षांसह अन्य सदस्यांनी आनंद व्यक्त केला. पुढील वर्षी समितीला मार्गदर्शनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.
३. कार्यक्रमस्थळी कर्तव्यावर असणार्या पोलीस कर्मचार्यांनी साधनेविषयी जाणून घेतले आणि काही ग्रंथ खरेदी केले.
४. या कार्यक्रमामध्ये दोन सत्रांच्या मधल्या कालावधीत आचारधर्म, सात्त्विक अन्न, सात्त्विक पोषाख, सात्त्विक केशरचना यांविषयीची आध्यात्मिक माहिती ध्वनीवर्धकावरून देण्यात आली. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
५. या वेळी श्री. राधाकृष्णन् यांनी केरळ शिवसेना, हिंदु मुन्नानी (हिंदुंसाठी अग्रेसर) आणि सेवा भारती या संघटनांच्या काही हिंदुत्वनिष्ठांची ओळख करून दिली.
६. कन्याकुमारी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महादेवन् हे आयोजन समितीचे सदस्य होते. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची सर्व सोय केली होती.