- हिंदुबहुल भारतात २८ वर्षांपासून ४ लाख ५० सहस्र हिंदूंना विस्थापितांचे जीवन जगायला लावणारा जगातील एकमेव देश भारत !
- हिंदूंच्या वस्तीत अन्य पंथियांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे तथाकथित निधर्मी, पुरो(अधो)गामी आदी मुसलमानबहुल काश्मीरमधून हिंदूंना विस्थापित केल्याविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
जम्मू : काश्मीरमध्ये ‘होमलॅण्ड’ (स्वतःची भूमी) मिळाल्यासच विस्थापित काश्मिरी हिंदू खोर्यात परत जातील, असे प्रतिपादन विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी कार्यरत असणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. अश्वनीकुमार च्रोंगू यांनी केले. ‘पनून कश्मीर’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘काश्मीर हे काश्मिरी हिंदूंचेच आहे. मग त्यांनी काश्मीरमध्ये ‘पर्यटक’ म्हणून का जावे ? काही किरकोळ तडजोडीच्या आधारे काश्मिरी हिंदू खोर्यात आयुष्य काढू शकत नाहीत. हिंदूंना काश्मीरमध्ये वसवण्यासाठी सरकारला त्यांना विश्वसात घ्यावे लागेल. आम्ही वर्ष १९९१ मध्ये दिलेला ‘होम लॅण्ड’चा प्रस्तावच या विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या समस्येवरील अंतिम उपाय आहे. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नवी देहलीतील कार्यक्रमात काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणांना विरोध दर्शवला. हे चांगले पाऊल आहे; मात्र त्यांनी हे काश्मीरमधील फुटीरतावद्यांना सांगितले पाहिजे. त्यामुळेच काश्मीरमधील हिंसाचार अल्प होईल. सैनिकांची आतंकवादाच्या विरोधात चालू असलेली मोहीम स्तुत्य आहे.
दोन दिवसांत त्यांनी अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. पाकने त्यांच्या भूमीचा वापर आतंकवादासाठी करू देणे, ही पूर्ण जगाची समस्या असून चिंतेचा विषय आहे.’’ या बैठकीत प्रा. एम्.एल्. रैना, जे.एल्. कौल, वीरेंद्र रैना, वीरेंद्र कौल, विजय काझी, सुमीर भट आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात