शहजादपूर, सोनपत (हरियाणा) : सध्या राजकीय स्वार्थासाठी ब्रिटिशांनी वापरलेल्या ‘तोडा आणि फोडा’ या नीतीचा वापर केला जात आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी हिंदूंनी संघटित रहाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी येथील हिंदुत्वनिष्ठांशी संवाद साधतांना केले. समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी समितीचे कार्य आणि हिंदु धर्मावर होत असलेले आघात यांविषयी उपस्थितांना माहिती दिली. समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. दीपक जमदग्नी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
देशात राजकीय स्वार्थासाठी ब्रिटिशांच्या ‘तोडा आणि फोडा’ नीतीचा वापर : कार्तिक साळुंके
Tags : Hindu Janajagruti Samiti