जयपूर : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्र सिंह कालवी यांची जयपूर येथील त्यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्यःस्थितीविषयी सविस्तर चर्चा झाली. श्री. कालवी यांनी ‘पद्मावत’ या वादग्रस्त चित्रपटाविषयी त्यांना आलेले चांगले-वाईट अनुभव कथन केले. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी देशाची हानी होत असल्याविषयी त्यांनी खंतही व्यक्त केली.
या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या प्रयत्नांविषयी विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी समितीच्या वतीने श्री. कालवी यांना हिंदी भाषेतील ‘हिंदु राष्ट्र आवश्यक का ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.