Menu Close

पुणे येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कायदेशीर साहाय्य करण्याचा अधिवक्त्यांचा निर्धार !

पुणे :  जंगली महाराज रस्ता येथील अधिवक्त्यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कायदेशीर साहाय्य करण्याचा निर्धार केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘मंदिर सरकारीकरण आणि लव्ह जिहाद’ या विषयांवरील ध्वनीचित्र-चकती दाखवून राष्ट्राची सद्य परिस्थिती आणि भेडसावणार्‍या अडचणी यांविषयी अधिवक्त्यांना अवगत केले.

‘सध्या खोटी कलमे लावून निरपराध हिंदूंना अटक केली जाते; परंतु त्यांचे वकीलपत्र घेण्यास कुणीही सहजासहजी सिद्ध होत नाही. या पार्श्‍वभूमीवर हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व अधिवक्त्यांचे संघटन होणे महत्त्वाचे आहे’, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनीही समिती राबवत असलेले उपक्रम आणि समितीचे कार्य यांविषयी उपस्थित अधिवक्त्यांना माहिती दिली. या वेळी प्रत्येक मासातून एकदा बैठकीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे ठरवले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *