- ‘गाढवाला गुळाची चव काय ?’ ही म्हण सार्थ ठरवणारे सायरो-मालाबार चर्च !
- ‘ईश्वरप्राप्तीसाठीचे ध्येय ठेवून एक साधना म्हणून योगासने केली की, ईश्वरी अनुभव येतो’, हे हिंदु धर्मातील लाखो लोकांनी आतापर्यंत अनुभवले आहे ! मात्र ख्रिस्ती चर्च केवळ धर्माच्या चष्म्यातून पहात त्याला विरोध करून स्वतःची पात्रता दर्शवत आहे !
- नेहमीच सर्वधर्मसमभावाचा ढोल बडवणारे पुरोगामी याविषयी बोलतील का कि सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच दाखवायचा असतो ?
इडुक्की (केरळ) : योग ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे साधन नाही. त्यामुळे ख्रिस्त्यांनी त्याच्यापासून दूर रहावे, असा दावा केरळच्या सायरो-मालाबार चर्चच्या सैद्धांतिक आयोगाच्या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल पाली बिशप जोसेफ कल्लारगट्टू यांनी सिद्ध केला असून या अहवालास सायरो-मालाबार चर्चच्या धर्मसभेने संमती दिली आहे. दुसरीकडे काही पाद्री आणि ख्रिस्ती यांनी या अहवालास विरोध दर्शवला आहे.
सायरो-मालाबार चर्चच्या अहवालातील हिंदुद्वेषी दावे
१. योग देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही. ‘योग ईश्वराचा साक्षात्कार करण्यासाठी साहाय्यकारक आहे’, यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.
२. योग व्यक्तीच्या अंतरात कोणत्याही स्वरूपाचे पालट घडवून आणत नाही.
३. रा.स्व. संघ आणि संघ परिवार संपूर्ण देशात योगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ख्रिस्त्यांनी योगाभ्यासाविषयी अधिक सतर्क रहायला हवे.
४. ख्रिस्ती आणि चर्चचे प्रमुख यांनी योगावर लक्ष देणे आणि अन्य आध्यात्मिक आंदोलने, यांपासून सतर्क असले पाहिजे.
५. अनेक शारीरिक त्रास दूर होण्यासाठी ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात योगासने करत आहेत; मात्र योग कॅथलिक मान्यतेच्या एकदम विरोधी आहे. योग आणि अन्य ख्रिस्तीविरोधी प्रथा चर्चच्या अधिकृत शिक्षणाला प्रोत्साहित करत नाहीत. त्यामुळे कुणीही योगाला प्रोत्साहन देऊ नये.