हज यात्रेच्या हवाई प्रवासासाठी दिलेली सवलत रहित करावी !
बिरमित्रापूर (ओडिशा) : केंद्र सरकारने वर्ष २०१८ मध्ये होणार्या हज यात्रेच्या हवाई प्रवासासाठी दिलेली सवलत आणि भाग्यनगर येथे तेलंगण सरकारने रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वसविण्यास दिलेली अनुमती त्वरित रहित करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयातील मुख्य लिपिक श्री. विल्यम बोद्राजी यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी धर्माभिमानी अधिवक्ता बिभूती भूषण पलेई, हिंदु सेनेचे सर्वश्री जयराज ठाकूर, कपिल त्रिपाठी, एस्.व्ही. शामकुमार, सोनू शर्मा, संदीप दास, धर्मेंद्र सिंह, सनातन संस्थेचे श्री. प्रेम प्रकाश, हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर आदी धर्माभिमानी उपस्थित होते. केंद्र सरकारकडून १६ जानेवारी २०१८ या दिवशी हज यात्रेसाठी दिलेले अनुदान रहित करण्यात आले. तथापि केवळ दीड मासाच्या आतच सरकारने हज यात्रेकरूंना हवाई यात्रेत १५ ते ४५ टक्के सवलत घोषित केली होती.