-
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल नंतर आता महाराष्ट्रातही हिंदु नेत्यांवर आक्रमणे !
-
हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाची सखोल चौकशी करून हिंदु नेत्यांना संपवू पहाणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !
आतापर्यंत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि बंगाल येथे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या. आता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातही अशी आक्रमणे होऊ लागली आहेत. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करण्यासाठी जाऊ नये, यासाठी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि तेलंगानातील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना अनेकदा धमकावण्यात आले. तरीही धर्मांधांच्या धमक्यांना भीक न घालता टी. राजासिंह हे सभेमध्ये उपस्थित राहिले आणि सभेनंतर परततांना धर्मांधांनी त्यांच्या गाडीला घातपात करून जीवे मारण्याचा भ्याड प्रयत्न केला. या आक्रमणाकडे एक अपघात म्हणून न पहाता, या प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी आणि धर्मांधांचे षड्यंत्र उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट घनवट यांनी शासनाकडे केली.
हिंदु जनजागृती समितीने ७ आणि ८ एप्रिल यादिवशी अनुक्रमे मालेगाव आणि बीड येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला न येण्यासाठी सुमारे २०० हून अधिक धमक्या देशातून आणि विशेषतः आखाती देशांतून मिळणे आणि लगेचच त्यांच्या गाडीचा घातपात करण्याचा प्रयत्न होणे, हा घटनाक्रम निश्चितच चिंताजनक आहे. त्यातच घातपाताचा प्रयत्न करणार्या कंटेनरचा मालक आणि चालक हे धर्मांध असणे, यातून घटनेचे गांभीर्य लक्षात येते. आज ईश्वरी कृपेमुळे या घातपातातून टी. राजासिंह बचावले, तरी घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. धर्मांधांच्या अशा प्रयत्नांकडे दुर्लक्ष केल्यास छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांचे मुडदे पडणे, ही सामान्य बाब होईल. देशभरात हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे संपवण्याच्या घटना केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि बंगाल या राज्यांत घडल्याचे सर्वश्रृत असून महाराष्ट्रही त्याच वाटेवर जाण्याचा धोका शासनाने लक्षात घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही श्री. घनवट यांनी या प्रकरणी केली.
देवाच्या आशीर्वादामुळे घातपातातून सुखरूप बचावलो ! – टी. राजासिंह
देवाच्या आशीर्वादामुळे या घातपातात माझ्या केसालाही धक्का लागला नाही. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. शत्रूंनी हे ध्यानात घ्यावे की, आम्ही धर्माचे कार्य करणारे आहोत आणि अखंड हिंदु राष्ट्र हे आमचे ध्येय आहे, जो धर्मासाठी कार्य करतो त्याचे रक्षण भगवंत करतो ! देवाच्या आशीर्वादामुळे घातपातातून सुखरूप बचावलो, अशी प्रतिक्रिया या आक्रमणानंतर आमदार टी. राजासिंह यांनी व्यक्त केली.