कोंढवा (जिल्हा पुणे) येथे ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ !
पुणे : कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे. संबंधित जागा बळकावून ती भाड्याने देत लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी आयुब पटवेकर, हबीबा अन्सार शेख, आरिफ मन्सूर सय्यद आणि आत्तारबशीन महंमद सोहेल हमीद यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
(केवळ गुन्हा नोंद न करता धर्मांधांवर कडक कारवाई व्हायला हवी ! कोंढव्यातील अन्य भागांतही भूमी जिहाद झाला आहे का, याचीही सखोल चौकशी पोलिसांनी करावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सैन्यातील सेवानिवृत्त कॅप्टन परमिंदरसिंह चंडिओक (तक्रारदार) यांच्या भूमीवर ऑक्टोबर २०१७ पासून अतिक्रमणाचा प्रयत्न धर्मांधांकडून चालू होता. तक्रारदार चंडिओक यांच्या भूमीच्या शेजारी सोमनाथ रासकर यांच्या मालकीची ‘११ आर्’ ही भूमी आहे. धर्मांधांनी प्रथम ती भूमी खरेदी केली; मात्र तो व्यवहार पूर्ण केलेला नाही. त्यामुळे त्या प्रकरणी दावा प्रविष्ट आहे. असे असतांना शेजारील भूमीवरही त्यांचा मालकी हक्क सांगण्याचा प्रकार या धर्मांधांनी केला आहे. धर्मांधांनी त्या जागेवर २४ मीटर लांबीची शेडही उभारली, तसेच या जागेवर इमारत असल्याचे दाखवून त्यांतील ७२५ चौरस मीटर जागा एकास भाड्याने दिली.
त्यासाठी संबंधित व्यक्तीकडून ६ लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली आणि प्रतिमास ५० सहस्र रुपये भाडे, असा करार केला. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने आरोपींच्या कंत्राटदारांना शेड न उभारण्याविषयी दटावले होते; मात्र त्याचा काही परिणाम न झाल्याने त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षकक संतोष तासगांवकर करत आहेत. (उघडपणे भूमी जिहाद चालू असतांना याविषयी एकही लोकप्रतिनिधीे आवाज का उठवत नाही ? अनधिकृतपणे बळकावलेल्या भूमींचा अनेक वेळा आतंकवादी कारवायांसाठी वापर झाल्याची उदाहरणे आहेत. येत्या काळात या आणि अन्य भूमींचा वापर आतंकवादी कारवायांसाठी झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात