भारताची फाळणी करून मुसलमानांना एक देश देणार्या काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, तर त्यात आश्चर्य ते काय !
बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात एक जागा मुसलमान उमेदवारांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी कर्नाटकमधील मुसलमान नेत्यांच्या गटाने केली आहे. दलित नेत्यांनीही काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीशी चर्चा केली असून त्यांनीही अधिक जागा मागितल्या आहेत. वर्ष २०१३ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विविध मतदारसंघांतून १९ मुसलमान उमेदवारांना संधी दिली होती. त्यांपैकी १० उमेदवार निवडून आले.
१. के. रहमान खान यांच्यासह काँग्रेसमधील मुसलमान नेत्यांनी पक्षाच्या निवडणूक समितीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांनी मुसलमानांना अधिकाधिक जागा का मिळायला हव्यात ?, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
२. रहमान खान म्हणाले की, मुसलमानबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले, तर ते काँग्रेसला लाभदायक ठरेल. ज्या भागातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशा मतदारसंघातून आम्ही मुसलमानांंसाठी उमेदवारी मागत आहोत. योग्य संधी मिळाली, तर २८ जागांवर मुसलमान उमेदवार निवडून येतील, असा त्यांचा दावा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात