‘झी न्यूज’चे वार्तांकन
‘झी न्यूज’ला जी माहिती मिळते, ती भारत सरकारला का मिळत नाही कि त्यांना हिंदूंसाठी काहीही करायचे नाही ?
नवी देहली : म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.
१. म्यानमारच्या राखीन प्रांतात रोहिंग्या आतंकवादी आणि म्यानमारचे सैन्य यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या चकमकीच्या वेळी ५०० आतंकवाद्यांनी येथील एका गावावर आक्रमण केले होते.
२. या गावात ८०० हिंदू रहात होते. आतंकवाद्यांनी एकेक हिंदूला शोधून त्यांना ठार केले. ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी जाऊन घटनास्थळी नुकतेच वार्तांकन केले. या वेळी ‘हिंदु महिलांवर कसे अत्याचार झाले ?’, हे स्थानिकांनी वाहिनीच्या प्रतिनिधींना सांगितले.
३. आतंकवाद्यांनी हिंदूंना ठार केल्यावर महिलांचे अपहरण केले. त्यांचे कुंकू पुसून बांगड्या तोडल्या आणि त्यांना बुरखा घालायला भाग पाडले. नंतर त्यांना बांगलादेश आणि म्यानमार यांच्या सीमेवर नेले. याची माहिती म्यानमारच्या सैन्याला मिळाल्यावर बांगलादेशमधील रोहिंग्या शरणार्थी केंद्रात महिलांना लपवून ठेवण्यात आले.
४. म्यानमार सरकारने बांगलादेश सरकारशी बोलणे केल्यावर ८ महिलांना सोडवण्यात आले. तरीही अशा अनेक महिला आतंकवाद्यांच्या कह्यात असण्याची शक्यता आहे.
५. सोडवण्यात आलेल्या महिलांच्या परिवारातील लोकांना आतंकवाद्यांनी त्यांच्यासमोर ठार केल्याने त्या आता एकट्याच आहेत. त्यांनी म्यानमार आणि भारत सरकार यांच्याकडे साहाय्य मागितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात