Menu Close

देशात लोकसंख्या कायदा बनणे आवश्यक : विनोद यादव, अध्यक्ष, धर्मरक्षक संघटना

सभेला संबोधित करतांना माजी आमदार श्री. सुरेंद्रनाथसिंह, व्यासपिठावर डावीकडून श्री. गबरूदादाजी, श्री. अभय पंडित, नगरसेवक महेश मकवाना, मर्घटिया मंदिराचे महंत श्री. शंकरदासजी, महापौर श्री. आलोश शर्मा, श्री. अशोक सैनी, श्री. योगेश व्हनमारे आणि श्री. श्रीराम काणे

भोपाळ : वर्ष १९४७ मध्ये भारताची धर्मावर आधारित फाळणी झाली आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान बनले, तर उरलेला देश हिंदूंचा हिंदुस्थान व्हायला हवा होता; परंतु असे झाले नाही. आम्ही रामनवमी, हनुमान जयंती यांनिमित्त शोभायात्रा काढतो, कदाचित् येणार्‍या १० ते १५ वर्षांमध्ये त्या काढू शकणार नाहीत; कारण तोपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही अल्पसंख्यांक बनलेलो असू. ही स्थिती पालटण्यासाठी कठोर लोकसंख्या कायदा बनणे आवश्यक आहे. यासाठी आम्हा सर्वांना जातपात विसरून सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन धर्मरक्षक संघटनेचे नेते श्री. विनोद यादव यांनी धर्मसभेत केले. या सभेला २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी युवक उपस्थित होते. धर्मरक्षक संघटनेच्या वतीने येथे ‘भगवा शौर्य पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेपूर्वी या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी आमदार श्री. सुरेंद्रनाथ सिंह, भोपाळचे महापौर आलोश शर्मा, भाजपचे नेते श्री. अशोक सैनी, मर्घटिया मंदिराचे महंत श्री. शंकरदासजी, नगरसेवक श्री. महेश मकवाना, श्री. अभय पंडित आणि श्री. गबरूदादाजी, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि सनातन संस्थेचे श्री. श्रीराम काणे आदी उपस्थित होते.

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच एकमात्र उपाय ! – श्रीराम काणे, सनातन संस्था

आज लोकशाही असलेल्या भारतातील प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे. हा भ्रष्टाचार इतका वाढला आहे की तो थांबवणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबवण्यास लोकशाही पूर्णत: अपयशी ठरली आहे, असे लक्षात येते. या दुःस्थितीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमात्र उपाय आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *