सामूहिक विवाह सोहळ्यांच्या नावाखाली देवनिधी लुटला जाणार नाही, याची हमी कोण देणार ? – हिंदु जनजागृती समिती
वर्धा : शासनाने अधिग्रहित केलेल्या मंदिर समित्यांवर राजकीय नियंत्रण आल्याने आता येथेही भ्रष्टाचार बोकाळला आहे. शासकीय योजनांसाठी मंदिराचा निधी उपलब्ध करून देणे याचा अर्थ भ्रष्टाचारासाठी नवे कुराण उपलब्ध करून देण्यासारखे आहे. आधीच शासकीय योजनांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार होत असतांना या भ्रष्टाचार होणार नाही आणि सामूहिक विवाह सोहळ्यांच्या नावाखाली देवनिधी लुटला जाणार नाही, याची हमी कोण देणार ? यापूर्वी देवनिधीमध्ये ज्यांनी लुटला, त्यांच्यावर कारवाई कधी करणार ? याची उत्तरे मुख्यमंत्री महोदय हिंदू समाजाला देतील का ? ‘शासनाला पैसे द्यायचे असतील, तर ते अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळासाठी आणि पैसे घ्यायचे असतील, तर ते हिंदूंच्या मंदिरातून’ असे धोरण अत्यंत निषेधार्ह असून मंदिरातील पैसा हा सामूहिक विवाहसोहळ्यांवर नाही, तर धर्मकार्यासाठीच वापरला गेला पाहिजे, अशी भूमिका या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विकास भवनासमोर वर्धा येथे करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मांडण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. हितेश निखार या वेळी बोलत होते.
पाकिस्तानातून येणार्या निर्वासित हिंदूंच्या आवश्यकता पूर्ण करून त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी साहाय्य करावे, निर्वासित हिंदूंना त्यांचे पारपत्र संपल्यावर अथवा अन्य कारणास्तव बळजोरीने पाकिस्तानात पाठवू नये, ही मागणीही या वेळी करण्यात आली.