उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी देहली : चंद्र आणि तारे असणार्या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
रिझवी म्हणाले की, या झेंड्याचा इस्लामशी काहीही संबध नाही. त्यामुळे त्याच्या फडकवण्यावर बंदी घातली पाहिजे. हा झेंडा पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाशी आणि मुस्लिम लीगच्या झेंड्याशी मिळताजुळता आहे. हा झेंडा मुसलमानबहुल भागात फडकवण्यात येत असल्याने तेथे जातीय तणाव निर्माण होतो. हा झेंडा फडकवणारे स्वतःला पाकिस्तानशी संबंधित असल्याचे समजतात. महंमद पैगंबर यांच्या काळात पांढरा अथवा काळ्या रंगाच्या झेंड्याचा वापर केला जात होता. वर्ष १९०६ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाल्यावर तिने चंद्र आणि तारे असणारा हिरवा झेंडा निवडला.
काही दिवसांपूर्वी वसीम रिझवी यांच्या हत्येचा कट रचणार्या दाऊद इब्राहिम टोळीच्या तिघा गुंडांना देहली पोलिसांनी अटक केली होती. रिझवी यांनी अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला समर्थन दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात