पोलिसांना अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावण्यास भाग पाडणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यास प्रतिबंध होणे, हे सरकारला लज्जास्पद !
कोल्हापूर : जिल्ह्यातील केर्ले गावात २० फूट उंचीचा अफझलखानवधाचा मोठा फलक लावला होता; मात्र जातीय तणाव निर्माण होण्याचे कारण पुढे करून पोलिसांनी हा फलक १६ एप्रिलला सकाळी उतरवला. (प्रत्येक वेळी हिंदूंवरच दबावतंत्र का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयी हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी फलक पुन्हा त्याच ठिकाणी लावण्याची मागणी केली. केर्ले गावातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फलक का काढला ? यावरून पोलिसांशी वाद घातला.
शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रदीप नरके यांनी ‘हा फलक परत लावा अन्यथा शिवसैनिक पेटून उठतील’, अशी चेतावणी पोलीस यंत्रणेला दिली. (शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच अशी चेतावणी देऊ शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता पोलिसांनी फलक पुन्हा लावला. (यावरून पोलिसांना केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे हिंदूंनी समजायचे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात