भाईंदर (जिल्हा ठाणे) : नरेंद्र मोदी यांची सत्ता केंद्रात असतांनाही त्यांना राममंदिर बांधता येत नाही. त्यांच्या सरकारने कायदा केल्यास मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो; मात्र असे असतांनाही मोदी तसे करत नाहीत. मंदिर बांधण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असतांनाही ते दाद देत नाहीत, अशी टीका विश्व हिंदु परिषदेचे नेते आचार्य धर्मेंद्र यांनी येथे केली आहे. येथे आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमाला ते आले असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या वेळी आचार्य धर्मेंद्र पुढे म्हणाले, भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गायींची हत्या केली जात आहे.
आचार्य धर्मेंद्र यांनी मोहनदास गांधी यांच्या राष्ट्रपिता या उपाधीवर आक्षेप घेत त्यांना भगतसिंह यांच्या मृत्यूला उत्तरदायी ठरवले. जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत देश सोडावा लागला, असेही आचार्य धर्मेंद्र म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात