अमरावती : हिंदु जनजागृती समितीच्या अमरावती शहरातील राजकमल चौक या ठिकाणी ११ एप्रिलला, तसेच १२ एप्रिलला दर्यापूर तालुक्यातील शिवाजी चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी शहरातील आंदोलनाला ३५, तर दर्यापूर येथील आंदोलनाला ५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती. फेसबूकवरून आंदोलनाच्या केलेल्या थेट प्रक्षेपणाचा ६०० धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
दोन्ही ठिकाणच्या आंदोलनामध्ये श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी श्री. अभिषेक दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे, सौ. अनुभूती टवलारे, लिंगायत समाजाचे प्रतिनिधी श्री. पंकज क्षीरसागर यांनी आंदोलाविषयी आपले मत व्यक्त केले. आंदोलन झाल्यानंतर अमरावती शहरात जिल्हाधिकारी, तर दर्यापूर तालुक्यात तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील आंदोलनाला मोर्शी तालुक्यातील हिंदुत्वनिष्ठ श्री. राजूभाऊ बुरंगे त्यांच्या सहकार्यांसह आंदोलनाला आले, तर दर्यापूर येथील आंदोलनाला धामोरी या गावातील धर्मप्रेमी उस्त्फूर्तपणे सहभागी झाले होते.
दर्यापूर तालुक्यातील आंदोलनाचे आयोजन उत्स्फुर्तपणे स्थानिक धर्मप्रेमींनी केले होते. दर्यापूर येथील पहिलेच आंदोलन असून ५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. शहरातील आंदोलन बघून मोर्शी तालुक्यात आणि नांदगाव पेठ या गावात अशा स्वरूपाच्या आंदोलनाची मागणी करण्यात आली.
आंदोलनामध्ये करण्यात आलेल्या मागण्या . . .
- भारत शासनाने निर्वासित हिंदूंना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सोयी-सुविधा पुरवाव्यात आणि त्यांना तत्परतेने भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी साहाय्य करावे.
- कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून लिंगायत समाजास स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रहित करण्यात यावा.
- कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात महिला पुजारी नेमून सहस्रो वर्षांची परंपरा शासनाने परस्पर मोडीत काढू नये, या संदर्भात हिंदु धर्मातील धर्माचार्य, शंकराचार्य आदींचे मार्गदर्शन घ्यावे आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवून सर्व निर्णय घ्यावेत.
क्षणचित्रे
१. पाऊस असूनही शहरातील आंदोलनामध्ये सर्व धर्मप्रेमी सहभागी झाले होते. अमरावती शहरातील आंदोलनाच्या वेळी गारांच्या मुसळधार पावसातही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत आंदोलन चालूच ठेवले.
२. शहरातील आंदोलनाच्या ठिकाणी ८० वर्षांच्या गृहस्थांनी मला तुमचे कार्य बघून पुष्कळ आनंद झाला. माझ्याकडून शक्य होईल ते साहाय्य तुमच्या कार्याला निश्चितच करीन, असे कौतुकाचे उद्गार काढलेे.
३. आंदोलन झाल्यावर एका धर्मप्रेमी व्यावसायिकांनी समितीच्या कार्यामुळे योग्य दिशा मिळाल्याचे सांगून यापुढे त्यांच्या दुकानात समितीचा धर्मशिक्षणाचा फलक लावण्यास अनुमती दिली.