धार्मिक गोष्टींत केवळ हिंदूंंचीच गळचेपी का ? – डॉ. लक्ष्मण जठार, हिंदु जनजागृती समिती
मुंबई : अन्य धर्मातील प्रत्येक गोष्टीत सरकार त्या धर्मातील धर्मगुरूंचे मत विचारात घेते; मात्र हिंदूंच्या संदर्भात धर्मगुरूंना डावलून निर्णय घेतले जातात, हिंदूंवरच हा अन्याय का ? असा प्रश्न मुलुंड येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात डॉ. लक्ष्मण जठार यांनी केला. मुलुंड येथे समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १६ एप्रिल या दिवशी केलेल्या आंदोलनात ते बोलत होते.
म्यानमार आणि बांगलादेश येथून आलेल्या घुसखोरांविरोधात कारवाई करावी, पाकिस्तानातून आलेल्या हिंदु शरणार्थींना साहाय्य करावे, कर्नाटक काँग्रेस सरकारने लिंगायत समाजाला दिलेली स्वतंत्र धर्माची मान्यता रहित करावी, हिंदु देवतांचे विडंबन असणारा हिंदी चित्रपटाला प्रतिबंध करावा आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाची जलद गतीने चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदुस्थान, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, तसेच शिवसेना आणि भाजप यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात महिला पुजारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, शंकराचार्य, धर्माचार्य, संत यांचे मत लक्षात न घेताच घेतला. हा निर्णय रहित करावा, तसेच आमदार टी. राजासिंह यांच्यावरील आक्रमणचा जलद गतीने चौकशी करावी, अशी मागणी डॉ. जठार यांनी या केली.
सचिन घाग, श्री शिवकार्य प्रतिष्ठान हिंदुस्थान – कर्नाटक सरकारच्या लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्याच्या निर्णयाला वीरशैव धर्मगुरु, वीरशैव-लिंगायत समाज आणि जगद्गुरु यांनीही विरोध केला आहे. एवढेच नाही, तर वर्ष २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देणारा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे कर्नाटक काँग्रेस सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा.
गणेश पाटील, शिवसेना – पाकमधून भारतात आलेल्या शरणार्थी हिंदूंचे पुनर्वसन करण्यास सरकार उदासीन आहे. मायदेशी परतलेल्या या हिंदु शरणार्थींना जगात एकमेव आशास्थान असलेल्या हिंदुस्थानात आश्रय द्यावा.
क्षणचित्रे
१. आंदोलनात प्रथमच सहभागी झालेल्या काही धर्मप्रेमींनी सेवेत सहभागी होऊन आनंद मिळाल्याचे सांगितले.
२. श्री. आशिष शर्मा हे धर्मप्रेमी राष्ट्रीय आंदोलन पाहून स्वतःहून शेवटपर्यंत सहभागी होऊन यापुढेही आपल्या आंदोलनात नियमित सहभागी होणार, असे त्यांनी सांगितले.
३. १०० नागरिकांनी स्वाक्षरी करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.