आज जोधपूर येथील विशेष न्यायालयाने प.पू. आसारामबापूजी यांना दोषी ठरवले असले, तरी आपल्या संविधान प्रदत्त न्यायिक परंपरेनुसार कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविषयी असमाधान असेल, तर उच्च न्यायालयात जाता येते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही जाता येते. यापूर्वी अनेकांना कनिष्ठ न्यायालयात झालेली शिक्षा पुढे उच्च तथा सर्वोच्च न्यायालयात रहित झालेली आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे, तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात प.पू. आसारामबापूजी यांना न्याय मिळेल, अशी आशा आहे, असे सनातन संस्थेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आज कोट्यवधी हिंदूंना भक्तीमार्गाला लावून त्यांचे जीवन कृतार्थ करणारे, भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ ‘व्हॅलेन्टाईन-डे’सारख्या कुप्रथांना विरोध करत देशभरात मोठ्या प्रमाणावर ‘मातृ-पितृ दिन’साजरे करणे, ख्रिस्ती पंथांत धर्मांतरीत झालेल्या लाखो हिंदूंना स्वधर्मात आणणे, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरणे, गोसंवर्धन करणे, बालसंस्कारवर्गांच्या माध्यमातून भावी पिढी सुसंस्कारीत करणे आदी अनेक महत्कार्ये प.पू. आसारामबापूजी यांनी केली आहेत. त्यामुळे ते हिंदु समाजासाठी आदरणीयच आहेत.