नांदगाव पेठ (अमरावती) : येथे २२ एप्रिलला प्रथमच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनीही त्यांचे मत व्यक्त केले.
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित म्हणाले, ‘‘भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह हेही येथे सभेला येऊन गेले. त्यांचे हिंदुत्व आपण पाहिलेलेच आहे. असे असतांनाही त्यांच्यावर जीवघेणी आक्रमणे होत असतील किंवा त्यांना धमक्या येत असतील, तर त्यांच्या संरक्षणाचे दायित्व कोण घेणार ?’’
सनदशीर मार्गाने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार असूनही अनुमती पत्र देण्यास टाळाटाळ करणारे पोलीस !
अन्य धर्मियांच्या संदर्भात असे करण्याचे पोलिसांचे धाडस झाले असते का ?
नांदगाव पेठ पोलीस निरीक्षकांनी प्रथम आंदोलनाची अनुमती नाकारून ‘येथे आंदोलन घेण्याची काय आवश्यकता आहे ?’, असे विचारले. समितीच्या कार्यकर्त्यांनी अनुमती नाकारण्याचे कारण विचारल्यावर त्यांनी उत्तर न देता ‘ठीक आहे. अनुमती देतो; परंतु ध्वनीक्षेपक यंत्रणेचा वापर करू नका’, असे सांगितले. आंदोलनाची वेळ सायंकाळी ५ ते ७ अशी असूनही सायंकाळी ६.३० पर्यंत अनुमती पत्र कार्यकर्त्यांच्या हाती दिले नाही आणि ‘आंदोलन चालू करा’, असे सांगितले. अनुमती पत्र लेखी स्वरूपात आल्याविना आम्ही आंदोलन करू शकत नसल्याचे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितल्यावर सायंकाळी पोलिसांनी ते आणून दिले. त्यामुळे केवळ ४५ मिनिटेच आंदोलन करता आले.