Menu Close

मध्यप्रदेशमध्ये हिंदु जनजागृती समितीचे व्यापक हिंदूसंघटन अभियान

राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती आणि हिंदु राष्ट्र स्थापना या विषयांवर चर्चा

आखाडा परिषदेचे महामंत्री डॉ. अवधेशपुरी महाराज यांच्याशी भेट

‘उज्जैन येथील आखाडा परिषदेचे महामंत्री डॉ. अवधेशपुरी महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली. या वेळी धर्माची सद्य:स्थिती अणि त्यावरील उपाय आदी विषयांवर चर्चा झाली. या निमित्ताने केंद्र सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी महाराजांना ‘कभी भी पराधीन नहीं रहा है भारत’ (भारत कधीही पारतंत्र्यात राहिलेला नाही) हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. या वेळी धर्माभिमानी श्री. अरविंद जैन उपस्थित होते.

विद्वतजनांशी चर्चा

१. श्री ऋषि गुरुकुलाचे संस्थापक परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा, ४. गुरुकुलाचे विश्‍वस्त श्री. रामकृष्ण पौराणिक आदी विद्वतजनांशी चर्चा करतांना २. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि ३. प्रा. रामेश्‍वर मिश्र

श्री ऋषि गुरुकुलाचे संस्थापक परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांच्या निवासस्थानी विद्वतजनांची बैठक झाली. या बैठकीला प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी संबोधित केले. या वेळी श्री ऋषि गुरुकुलाचे विश्‍वस्त श्री. रामकृष्ण पौराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.

‘स्वर्णिम भारत मंचा’चे दिनेश श्रीवास्तव यांच्याशी भेट

‘स्वर्णिम भारत मंचा’चे श्री. दिनेश श्रीवास्तव आणि त्यांचे सहकारी यांनी प्रा. रामेश्‍वर मिश्र अन् सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी ‘स्वर्णिम भारत मंचा’च्या कार्याविषयी माहिती दिली. या भेटीत हिंदूसंघटनाचे कार्य कसे वाढवू शकतो, यावर चर्चा झाली.

लेखक श्री. सुरेश चिपळूणकर, श्री. भूपेंद्र गुलाटी आणि धर्माभिमानी यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि प्रा. रामेश्‍वर मिश्र यांची भेट घेतली. या वेळी समाजात जागृती निर्माण होण्यासाठी आवश्यक प्रयत्नांविषयी चर्चा झाली.

इंदूर येथील भारत स्वाभिमान मंचाच्या पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा

इंदूर येथील भारत स्वाभिमान मंचाच्या पदाधिकार्‍यांसमवेत प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची चर्चा झाली. या वेळी मंचाचे श्री. राजदीप आणि श्री. अमनदीप उपस्थित होते.

निवृत्त कर्नल बर्मन यांच्याशी भेट

सद्गुरु (डॉ.) पिंगळे आणि प्रा. मिश्र यांनी निवृत्त कर्नल बर्मन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी श्री. बर्मन यांनी सध्या ते करत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. यानिमित्त सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना गोवा येथील सनातन आश्रमाच्या भेटीचे निमंत्रण दिले.

‘हिंदुत्व अभियाना’चे अखिल भारतीय संघटक श्रवण सिंह यांच्याशी भेट

डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि श्री. श्रवण सिंह

उज्जैन येथील राष्ट्रसंत पू. लाहिडी गुरुजींचे शिष्य आणि ‘हिंदुत्व अभियाना’चे अखिल भारतीय संघटक श्री. श्रवण सिंह यांची प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत इतिहास, धर्म, संस्कृती आदी विषयांवर चर्चा झाली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *