हिंदूंनो, हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – अधिवक्ता श्रीराम ठोसर, प्रखंडमंत्री, विश्व हिंदू परिषद
रामनाथ (अलिबाग) : आज पुरोगाम्यांच्या खोट्या प्रचाराला हिंदू बळी पडत आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांतूनही विकृत इतिहास आमच्या पिढीला शिकवला जात आहे. लव्ह जिहाद, गोहत्या होत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्य करत आहेत, यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. ईश्वरी अधिष्ठान असलेले कार्य पूर्णत्वास जातेच; पण त्यासाठी मी काय योगदान दिले, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा, म्हणजे येणार्या भावी पिढीला चांगले दिवस पहायला मिळतील आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी केले, असे ते अभिमानाने सांगतील, असे प्रतिपादन येथील विश्व हिंदू परिषदेचे प्रखंडमंत्री अधिवक्ता श्री. श्रीराम ठोसर यांनी केले. येथील खानावमधील वेलवली गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला आजूबाजूच्या गावांतून २०० धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून आणि त्यानंतर वेदमूर्ती श्री. संदेश सुंकले आणि श्री. चेतन केळकर यांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने सभेला आरंभ करण्यात आला.
मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन
हिंदूंनो, आपला धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी सिद्ध व्हा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था
स्त्रियांना देवी स्वरूपात पुजणार्या हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी आज अनेक मार्गार्ंतून प्रयत्न केला जात आहे आणि हिंदूंचा बुद्धीभेद केला जात आहे; याउलट अन्य धर्मियांमध्ये होणार्या स्त्रियांच्या अत्याचाराविषयी ‘ब्र’सुद्धा काढला जात नाही आणि म्हणूनच आज हिंदूंनी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आपला धर्म अन् संस्कृती रक्षण करण्यास सिद्ध व्हावे !
हिंदूंनो, भ्रष्टाचार्याच्या निर्मूलनासाठी समितीच्या ‘सुराज्य अभियानात’ सहभागी व्हा ! – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती
आज देशात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली ‘हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्याकांना फायदे’ हे धोरण राबवले जात आहे. हिंदूंच्या मंदिरातील पैशांचा वापर करून एकीकडे हजचे अनुदान रहित करण्याचा निर्णय सरकार घेते आणि तोच पैसा केवळ मुसलमान मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जावा यासाठी सरकार कायदा बनवत आहे. मुसलमान मुलींना विवाहासाठी ‘शादीका शगुन’ ही योजना शासन कार्यान्वित करते हाच का सर्वधर्मसमभाव ? हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे आणि संतांच्या आशीर्वादाने येत्या २०२३ मध्ये हिंदु हे येणारच आहे. आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार होतांना दिसत आहे आणि हे रोखून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे पुष्कळ आवश्यक आहे. यासाठी समिती ‘सुराज्य अभियान’ राबवत आहे. यामध्ये आपणही सहभागी होऊन आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य बजावा, असे आमचे आवाहन आहे.
ग्रामीण भागात सभा आयोजित करण्याचे धाडस दाखवणार्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे ! – अधिवक्ता श्रीराम ठोसर
‘‘हिंदु धर्मजागृती सभेत विचार व्यक्त करण्याचा भाग्ययोग लाभला. अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातही या सभा आयोजित करण्याचे धाडस दाखवणार्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व शब्दांच्या पलीकडचे आहे. त्यांना ईश्वर बळ आणि यश कायमच देवो, हीच प्रार्थना.’’ (एका व्हॉट्सअॅपच्या गटावर दिलेला अभिप्राय)