Menu Close

पाकमधील निर्वासित हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व द्या ! – हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

बेळगाव : पाकिस्तानातून निर्वासित होऊन भारतात आलेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्यावे, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व शासकीय सोयी-सुविधा पुरवाव्यात, तसेच कर्नाटक सरकारने ‘लिंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून दिलेली मान्यता रहित करावी, या मागणीचे निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांच्या नावे देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या नावे हे निवेदन शिरस्तेदार श्री. मंजुनाथ जानकी यांनी स्वीकारले.

या वेळी भाजपचे श्री. संदीप कोकीतकर आणि श्री. अनिल कुरणकर, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. हेमंत हवळ, श्री. शिवा कदम, श्री. आनंद कवलिंगणावर, श्री. सुधीर गायकवाड, सौ. अक्काताई सुतार, सौ. मीलन पवार यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *