उज्जैन : येथील महाकाल मंदिर प्रशासनाने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, केंद्र सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्वर मिश्र आणि समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांचा अनुक्रमे श्री महाकाल मंदिर प्रबंध समितीचे सदस्य पंडित प्रदीप गुरुजी, श्री. विभाषजी उपाध्याय आणि श्री. जगदीश शुक्ला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी प्रा. रामेश्वर मिश्र यांनी त्यांच्या ‘भारत का संविधान और भारत का धर्म’ या पुस्तकाच्या प्रती उभयतांना भेट दिल्या.
चारधाम मंदिरातील वेदपाठशाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केंद्र शासनाचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्वर मिश्र यांनी येथील चारधाम मंदिराच्या वेदपाठशाळेमध्ये अध्यापन करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, चारधाम मंदिराचे स्वामी रमेशानंदगिरी महाराज उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे आचार्य रामस्वरूप ब्रह्मचारी यांनी केले होते.