पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनीच ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी ‘मातृ-पितृ दिन’ साजरा करण्यास प्रारंभ केला होता, हे लक्षात घेतले पाहिजे ! आता भाजपच्या उर्वरित १९ राज्यांतील सरकारांनीही हा निर्णय घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जयपूर : राजस्थानमधील भाजप सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजन’ दिवस म्हणून आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने २३ एप्रिलला या संदर्भातील परिपत्रक काढले आहे. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. राज्याचे शिक्षणमंत्री वसुदेव देवनानी यांनी या संदर्भात जानेवारी मासात विधानसभेत सूत्र मांडले. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, ‘मातृ-पितृ पूजना’द्वारे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे माता-पिता यांच्या प्रती प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात