मुंबई : हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान २०१८’च्या अंतर्गत २९ एप्रिल या दिवशी भांडुप येथील सर्व धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी मिळून ‘संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारे हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) शीघ्रातीशीघ्र स्थापन व्हावे’, यासाठी भांडुपची ग्रामदेवता गावदेवीमातेच्या देवळात जाऊन साकडे घातले.
साकडे घालण्यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. लक्ष्मण जठार यांनी उपस्थित धर्मप्रेमींना साकडे घालण्याचा उद्देश आणि महत्त्व सांगितले. त्यानंतर सनातन प्रभातचे वाचक आणि पुरोहित श्री. विजय ठोंबरे यांनी गावदेवीमातेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे अन् हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत’, असे साकडे घातले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. वनिता धुमाळ आणि सौ. वंदना पवार यांनी गावदेवीमातेची ओटी भरली.
महत्त्वाचे !
१. या वेळी कु. हेमांगी चव्हाण यांनी ‘साकडे घालतांना श्री भवानीमातेचे दर्शन झाले’, असे सांगितले.
२. साकडे घातल्यानंतर गावदेवी मित्रमंडळ, भांडुपचे श्री. सिद्धेश पाटील, श्री. आकाश बाबर, श्री. प्रतीक बामणे यांनी ‘आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे कार्य आवडले आहे. आम्हाला त्यात सहभागी होण्यास आवडेल’, असे सांगितले. देवीला साकडे घालतांना शिवसेनेचे श्री. सुनील मोरे, श्री. प्रदीप मोरे, बजरंग दलाचे श्री. विनोद जैन, श्री. समिष्ठ चौधरी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. उमेश रसाळ, श्री. सचिन घाग, सीताराम सेवा संघचे श्री. पापा सिंग आणि श्री. अनिल त्रिवेदी, तसेच सनातन प्रभातचे वाचक सर्वश्री प्रदीप भूवड, राजेश देसाई, विनायक सुर्वे, अरुण गोसावी, राजू सावंत, मोहन चाळके, रविराज शेट्टी, सत्यनारायण गौड, सौ. अंजली राणे, कु. हेमांगी चव्हाण आदि ३५ हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियानच्या अंतर्गत अन्य उपक्रम भांडुप विभागात कसे राबवू शकतो’, याची माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात