Menu Close

यवतमाळ येथे खासदार भावना गवळी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट

ग्रंथ स्वीकारतांना खासदार भावना गवळी, त्यांच्या उजवीकडे शिवसेनेचे शहराध्यक्ष पिंटू बांगर

यवतमाळ : येथील मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ एप्रिलला सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी समितीचे श्री. रवी देशपांडे यांनी समितीचे उपक्रम आणि हिंदु धर्मजागृती सभा यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

या वेळी त्यांनी ‘यवतमाळ येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला सहकार्य करू’, तसेच ‘शहरातील ग्रंथालयामध्ये सनातनचे ग्रंथ प्रायोजित करू’, असे आश्‍वासन दिले. त्यांना ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा’ या संदर्भातील सनातनचा ग्रंथ भेट देण्यात आला. शिवसेनेचे शहराध्यक्ष पिंटू बांगर आणि अन्य पदाधिकारी, तसेच सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल देऊळकर, समितीचे दत्तात्रय फोकमारे या वेळी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *