पनवेल : हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान २०१८’च्या अंतर्गत पनवेल येथील सर्व धर्म आणि राष्ट्रप्रेमी यांनी मिळून संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारे हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) स्थापन व्हावे, तसेच सर्व सत्त्वगुणी हिंदूंचे रक्षण व्हावे यासाठी विविध मंदिरांत साकडे घातले.
श्री बालाजी मंदिर – येथील मंदिर प्रबंधक श्री. जयप्रकाश शर्मा, श्री. धनराज जाधव आणि मंदिराचे पुजारी सर्वश्री रविशंकर तिवारी, वीरेंद्र तिवारी, तसेच यजमान श्री. उमेश शर्मा, अभिनव मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल खुंटले, धर्मप्रेमी श्री. मृणाल चौधरी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक हे उपस्थित होते.
शिवमंदिर, सनातन संकुल, देवद – येथील मंदिरात साकडे घालण्यासाठी सनातन संकुलातील सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप वाघमारे हे उपस्थित होते.
श्री गणेश मंदिर, शिवा कॉम्प्लेक्स – येथे श्री गणेशाला साकडे घालतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलींद पोशे आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (७.५.२०१८) या दिवशी आहे. जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी १ मे या दिवशी सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विविध देवतांना साकडे घालण्यात आले.
शिराळा (सांगली)
येथील ग्रामदैवत अंबामातादेवीला साकडे घालण्यात आले. या वेळी १५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. ईश्वरपूर येथे यल्लामादेवीला साकडे घालण्यात आले. त्या वेळी ३० धर्मप्रेमींची उपस्थिती होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर)
येथील ग्रामदैवत मरीमाईदेवीच्या मंदिरात साकडे घालण्यात आले. या वेळी मंदिराचे गुरव सौ. कमल पांडुरंग गुरव यांनी देवीची ओटी भरली, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी साकडे घालतांना उपस्थितांना प्रार्थना सांगितली. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री दिलीप कुंभार, समीर धनलोभे, माजी नगरसेवक श्री. भगवान सपाटे, श्री. दिनेश शेरे, श्री. प्रसाद तारे आणि कुटुंबीय, पुरोहित श्री. राहुल जोशी, पुरोहित श्री. पवन वेडे, श्री. आशिष कोळवणकर, श्री. सुधाकर मिरजकर, श्री. अनंत डोणे उपस्थित होते.
सातारा
महाबळेश्वरजवळ असलेल्या मेटगुताड या गावातील श्री जननी कुंबळजाईमाता या स्वयंभू देवीला साकडे घालण्यात आले. या वेळी २० धर्मप्रेमी उपस्थित होते.
‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर सांगली आणि कोल्हापूर जिल्हात प्रवचन
मिरज (जिल्हा सांगली) – सुभाषनगर येथे टाकळी येथील सरपंच श्री. संगप्पा लोखंडे यांच्या घरी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर सौ. रत्ना भंगाळे यांनी प्रवचन घेतले. या प्रवचनाची सर्व सिद्धता श्री. लोखंडे यांनी केली होती. या वेळी वाचक सुनीता कुलकर्णी यांच्यासह २४ धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या.
कोल्हापूर – उचगाव येथील श्री. शिवानंद स्वामी यांचे घरी २६ एप्रिल या दिवशी सौ. साधना पट्टणशेट्टी यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेतले. या वेळी १८ धर्मप्रेमींची उपस्थिती होती. कोल्हापूर शहर येथे सौ. ज्योति देशपांडे यांच्या घरी सौ. भाग्यश्री गायकवाड यांनी १ मे या दिवशी आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर प्रवचन घेतले. याचा लाभ २० जिज्ञासूंनी घेतला.