डोंबिवली : ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत येथील पश्चिम भागातील धर्म आणि राष्ट्र प्रेमी यांनी ‘संपूर्ण विश्वाचे कल्याण साधणारे हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) लवकरात लवकर स्थापन व्हावे’, यासाठी येथील स्वयंभू प्रकट महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती मुंब्रादेवीला, तसेच जुन्या डोंबिवलीतील शिव मंदिरातील शिवाला भावपूर्ण साकडे घातले !
साकडे घालण्यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अरुण कुलकर्णी यांनी उपस्थित धर्मप्रेमींना साकडे घालण्याचा उद्देश आणि महत्त्व सांगितले. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभावे अन् हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. या वेळी सनातनच्या साधिका सौ. संगिता तांडेल यांनी देवीची ओटी भरली.
या वेळी पुजारी बाळकृष्ण सावंत, सौ. कौसल्या कर्रेकेरा, सनातन प्रभातचे वाचक श्री. योगेश नारकर, श्री. मयुरेश शेट्ये, साईनाथ मित्र मंडळाचे श्री. गणेश जाधव यांसह १२ धर्माभिमानी, तसेच जुन्या डोंबिवलीतील शिवमंदिर येथे ४० धर्माभिमानी उपस्थित होते.
समितीचे श्री. कुलकर्णी यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत घेण्यात येणार्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती सांगून उपस्थितांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. जुनी डोंबिवली, शिवमंदिरात साकडे घालण्यासाठी लोकजागृती प्रतिष्ठानचे ८ कार्यकर्ते सहभागी झाले होते, श्री. वेद पांडे यांचा तांरखेनुसार जन्मदिवस असताना साकडे घालणे ठरले म्हणून त्यांनी पालघरला त्यांच्या कामासाठी जाण्याचे रहित केले.