१. व्हिक्टर कझिन, फ्रेंच तत्त्ववेत्ता (१७९२ – १८६७)
‘अलीकडे युरोपमध्ये प्रसार होत असलेले पूर्वेकडील साहित्य, विशेषतः भारतातील काव्य आणि तत्त्वज्ञान यांसंदर्भातील साहित्य वाचतो, तेव्हा आपल्याला विद्वत्तापूर्ण अशा अनेक सत्यांचा शोध लागतो. याउलट पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांचे साहित्य मर्यादित आणि क्षुद्र असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पूर्वेकडील या साहित्यापुढे आपण आपोआपच नतमस्तक होतो. अखिल मानवजातीला उच्च तत्त्वज्ञानाचे माहेरघर असलेल्या या देशातील तत्त्वज्ञानाचाच खरा आधार आहे.’
२. जे. रॉबर्ट ओपेनहेइमर, अमेरिकन आण्विक भौतिकशास्त्रवेत्ता (१९०४ – १९६७)
‘१६.७.१९४५ या दिवशी न्यू मॅक्सिको, अमेरिका येथे अणूबाँबच्या स्फोटाची प्रथम चाचणी झाल्यावर त्यातून निघालेले धुराचे लोट पाहून अणूबाँबचा जनक ओपेनहेइमर याने भगवद्गीतेचा संदर्भ घेऊन पुढीलप्रमाणे उद्गार काढले, ‘आकाशात सहस्रो सूर्यांचा एकाच वेळी स्फोट झाल्यावर दिसणारा प्रकाश सर्वशक्तीमान अशा भगवंताच्या अद्भुत तेजाप्रमाणे असेल. अणूबाँब सिद्ध करून मी जगाचा विध्वंस करणारा मृत्यूचा साक्षात् दूतच बनलो आहे. गेल्या अनेक शतकांशी तुलना केल्यास वेदांचा अभ्यास करायला मिळणे, हे या शतकात लाभलेले वैशिष्ट्य आहे’, असे म्हणावे लागेल.’
३. अल्बर्ट आईन्स्टाईन, जर्मन वैज्ञानिक (१८७९ – १९५५)
‘भगवद्गीता वाचतांना ‘देवाने सृष्टी कशी निर्माण केली ?’ याविषयी मी चिंतन करतो, तेव्हा सर्वकाही मिथ्या वाटू लागते. संख्याशास्त्र शिकवणार्या भारतियांचे आम्ही पुष्कळ ऋणी आहोत. ते नसते तर कोणतेही वैज्ञानिक शोध लावणे अशक्यप्राय होते.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात