जगात मानवतेचा दिंडोरा पिटणार्या भारताला पाकिस्तानमधील हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर काही करावे, असे का वाटत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदु, ख्रिस्ती, शीख, अहमदिया आणि हजारा यांसारख्या धार्मिक अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालू असून सरकार त्यांचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहे. आतंकवादाशी संबंधित हत्या अल्प झाल्या असतील; परंतु अल्पसंख्यांक हिंसाचाराचे आघात अजूनही झेलत आहेत. त्यामुळे येथील हिंदूंना हलाखीचे जीवन जगणे भाग पडत आहे, असे मानवाधिकार आयोगाने त्यांच्या ‘स्टेट ऑफ ह्यूमन राइट्स इन २०१७’ हा अहवाल प्रसिद्ध करतांना म्हटले आहे.
१. या अहवालानुसार अल्पसंख्यांकांचे अपहरण करणे, त्यांच्यावर ईशनिंदेचे खोटे आरोप करून त्यांच्यावर आक्रमणे करणे, अनेक लहान मुलांना धोकादायक कामे करावी लागणे, महिलांवर अत्याचार चालू असणे आदी चिंताजनक घटना मागील वर्षांत घडल्या आहेत.
२. पाकिस्तानमध्ये पत्रकार आणि ‘ऑनलाईन’ स्तंभलेखक यांना सतत धमक्या मिळत आहेत. त्यांच्यावर आक्रमणे होत असून त्यांचे अपहरण होत आहे. लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना कट्टरतावाद्यांकडून बंधने लादली जात आहेत.
३. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तेथील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या २० टक्क्यांहून अधिक होती. वर्ष १९९८ च्या जनगणनेनुसार ही संख्या घटून केवळ ३ टक्क्यांहून थोडी अधिक शेष राहिली आहे. (गेल्या २० वर्षांत पाकिस्तानमध्ये किती हिंदु शिल्लक असतील ?, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. येथील हिंदूंची धर्मांतर ही सर्वात मोठी समस्या आहे. येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण केले जात असून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करून मुसलमानांशी लग्न लावून दिले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात