Menu Close

कल्याण आणि डोंबिवली येथे ठिकठिकाणी प्रवचने !

कल्याण : साधना करतांना व्यष्टी साधनेसमवेतच काळानुसार  क्षात्रधर्म साधनाही तितकीच आवश्यक आहे. आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अनेक हिंदू आणि अन्य पंथीय यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून हिंदु धर्माची हानी होत आहे. त्याचे स्वरूप जाणून घेऊन ती हानी रोखणे प्रत्येक साधनारत जीवाचे कर्तव्य आहे. सर्व संप्रदायांनी आपल्या सांप्रदायिक चौकटीतून बाहेर पडून ‘एक हिंदु’ म्हणून या राष्ट्र-धर्म उत्थानाच्या कार्यात अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन सनातनच्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी येथील भगवा तलाव भागातील राममंदिर येथे केले. ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि व्यष्टी साधनेचे महत्त्व या विषयावर त्यांनी प्रवचने घेतली.’ ४५ धर्माभिमान्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

क्षणचित्रे

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने घेणारे ह.भ.प. नीलेश महाराज यांनी त्यांच्या प्रवचनाआधी अर्धा घंटा विषय मांडायला संधी दिली होती. विषय मांडून झाल्यावर पुन्हा वरील विषयाला अनुषंगून ‘सध्याच्या काळात धर्महानी कशी होत आहे’, याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

२. कल्याण पश्‍चिम येथील सप्तश्रृंगी मंदिरात स्वामी समर्थ संप्रदायाच्या साप्ताहिक सत्संगानंतर उपस्थितांसमोर सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी प्रवचन घेतले. ३० धर्माभिमान्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

क्षणचित्र

या ठिकाणी आलेले एक खाजगी शिकवणी घेणारे समर्थभक्त जिज्ञासू हिंदुत्वनिष्ठ म्हणाले, ‘‘तुम्ही अधूनमधून असे विषय घ्यायला सत्संगात येत जा. अशा जागृतीची पुष्कळ आवश्यकता आहे. मी मुलांना याविषयी सांगायचा प्रयत्न केला; पण माझ्यावर तसे न करण्यासाठी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडूनच दबाव टाकण्यात आला.’’

३. येथील समृद्धी सोसायटीमध्ये सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने प्रवचन घेतले. ४५ धर्माभिमान्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

क्षणचित्र

  • हिंदुत्वनिष्ठ श्री. पुष्कर उपासनी यांनी या प्रवचनाचे ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण केले.
  • ‘छायाचित्र काढण्याच्या दृष्टीने पुरेसा प्रकाश करू शकतो का ? ’ असे सांगितल्यावर श्री. उपासनी यांनी प्रकाशझोताची व्यवस्था करून दिली.

डोंबिवली

येथील स्वामी चिदंबर मठात सौ. दीक्षा पेंडभाजे यांच्या प्रवचनाचा ४० धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.

क्षणचित्रे

  • विषय आवडल्याचे सर्वांनी या वेळी सांगितले. मठाचे कमिटी मेंबर म्हणाले, ‘‘तुम्ही पुन्हा हा विषय घ्यायला यायची आवश्यकता आहे.’’
  • या वेळी इतर ठिकाणी प्रवचन घेण्याचीही मागणी आली.
  •  मठाच्या वतीने सौ. दीक्षा पेंडभाजे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मंत्र म्हणून त्यांची ओटी भरण्यात आली.

Related News

0 Comments

  1. Vinod K Dangwal

    अभिजीत को दंड मिलना बहुत ज़रूरी है क्योंकि उसने बे-घर ग़रीबों का बहुत ही निर्दयी मज़ाक उदय था! वह भी एक ऐसे एक्टर का साथ देने के लिए जो बहुत ही ग़लत काम कर चुका था!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *