Menu Close

धर्मप्रेमींकडून जातेगाव (जिल्हा बीड) येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

जातेगाव येथील श्री यमाईदेवीच्या चरणी प्रार्थना करतांना धर्मप्रेमी

जातेगाव (तालुका गेवराई) : जातीजातींमध्ये अडकलेल्या हिंदूंनी राजकारण्यांचे षड्यंत्र निरस्त करण्यासाठी संघटित व्हा, तसेच धर्माचरण करून हिंदू धर्मपरंपराविषयी बुद्धीभेद करणार्‍या ब्रिगेडी संघटनाचा विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. २७ एप्रिल या दिवशी येथील छोट्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन धर्म मंडल संघटनचे श्री. गणेश भिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील राऊत यांसह अन्य धर्मप्रेमींनी केले होते. या वेळी २५० धर्मप्रेमी सभेला उपस्थित होते.

श्री. मनोज खाडये यांचा सत्कार ह.भ.प. विनायक महाराज मरकड यांनी केला, तर ह.भ.प. विनायक महाराज मरकड यांचा सत्कार शिवदास चव्हाण यांनी केला, तसेच ह.भ.प. महेश महाराज चव्हाण यांचा सत्कार श्री. पांडुरंग चव्हाण यांनी केला. सभेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सह कार्यवाहक श्री. कृष्णाजी वाघमारे सर यांनी केले.

क्षणचित्रे

१. गावात २ विवाह असल्याने सभेसाठी व्यासपीठ उपलब्ध होण्यास अडचण येत होती; पण धर्मप्रेमींच्या तळमळीने ते अल्प कालावधीत उपलब्ध झाले.

२. सभेपूर्वी धर्मप्रेमींनी मैदान झाडून घेतले आणि अडथळे दूर होण्यासाठी गोमूत्राने शुद्धीही केली.

३. धर्मशिक्षणवर्गाला येण्याची सिद्धता दर्शवण्यासाठी सर्व उपस्थितांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

४. सभेच्या दिवशीच २ विवाहसोहळे पार पडल्यावर त्वरित २५० लोक सभेला उपस्थित राहिले.

५. धर्मप्रेमींनी सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी येथील श्री यमाईदेवीच्या चरणी एकत्रित प्रार्थना केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *