गुरुकुलांनी स्वत:च्या बळावर उभे रहावे ! – स्वामी संवित् सोमगिरी महाराज
उज्जैन (मध्यप्रदेश) : ज्ञानासमवेत पुरुषार्थही आवश्यक आहे. गुरुकुलांचा उत्कर्ष साधण्यासाठी आपल्यामध्ये बळ निर्माण करावे लागेल. गुरुकुलांनी स्वत:च्या बळावर उभे रहावे. त्यामुळे सरकार कोणाचेही असले, तरी आपले काम चालूच राहील, असे प्रतिपादन राजस्थानच्या शिवबाडी (बिकानेर) येथील ‘मानव प्रबोधन प्रन्यासा’चे संस्थापक अध्यक्ष स्वामी संवित् सोमगिरि महाराज यांनी केले.
उज्जैन येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय गुरुकुल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षि सांदिपनि राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान येथे झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी स्वामी गोविंद देवगिरी महाराज, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेेकर, मानव संसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह आदी उपस्थित होते. या संमेलनामध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षणावर आधारित फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
स्वामी संवित् सोमगिरि महाराज यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचे स्वागत केले.