Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मंदिरांत साकडे

सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ७ मे २०१८ या दिवशी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सोलापूर, नाशिक, उत्तराखंड येथील विविध मंदिरात साकडे घालण्यात आले.

हरिद्वार येथील स्वतंत्रपुरी धाम आश्रम येथे साकडे घालतांना भाविक
नाशिक येथील गोरा राम मंदिरात प्रार्थना करतांना भाविक
सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मंदिरात हिंदुत्वनिष्ठांनी साकडे घातल्यावर प्रसादरूपी श्रीफळ देतांना पुजारी
धारासुरमर्दिनीदेवीची ओटी भरतांना साधिका

सोलापूर : येथे ३० एप्रिल या दिवशी येथील सिद्धेश्‍वर मंदिर येथे श्रीसिद्धरामेश्‍वराला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, भाविक यांच्या वतीने साकडे घालण्यात आले. या वेळी पुजारी श्री. महेश स्वामी, श्री. आकाश हाब्बु यांसह धर्मप्रेमी उपस्थित होते. एम्आयडीसी भागातील वरदविनायक मंदिरात सनातनचे साधक श्री. बालराज दोंतुल यांच्यासह धर्मप्रेमी यांनी संकल्प आणि अभिषेक करण्यात आला. रूपाभवानी मंदिरातही पुजारी श्री. संजीव पवार यांनी देवीला साकडे घातले. या वेळी २० धर्मप्रेमी उपस्थित होते. सरवदेनगर येथील हनुमान मंदिरात धर्मशिक्षणवर्गातील २५ धर्मप्रेमींनी साकडे घातले.

सोलापूर जिल्ह्यातून यात्रेसाठी गेलेल्या साधकांनी हरिद्वार (उत्तराखंड) येथील स्वतंत्रपुरी धाम आश्रम येथे ५५ भाविकांसह साकडे घातले. यात्रेतील भाविकांनी ‘आम्हाला राष्ट्र आणि धर्मकार्यात सहभागी होता आले, तसेच घोषणांमुळे उत्साह वाढला’, असे सांगितले. तसेच नाशिक येथील काळा श्रीराम मंदिर आणि गोरा राम मंदिर येथे साकडे घालण्यात आले.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे मंदिराची स्वच्छता करून साकडे घालण्यात आले. या वेळी दैनिक सनातन प्रभातचे वाचकही सहभागी झाले होते.

गेवराई (जिल्हा बीड) येथील चिंतेश्‍वर मंदिरात धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते.

पंढरपूर येथील श्री ताकपिठे विठोबा मंदिरात धर्मप्रेमींनी साकडे घातले.

म्हाळुंग (जिल्हा सोलापूर) येथील श्री यमाईदेवीला धर्मप्रेमींनी साकडे घातले. या वेळी ४० धर्मप्रेमी उपस्थित होते.

धाराशिव येथील ग्रामदैवत श्री कपालेश्‍वर मंदिरात साकडे घालण्यात आले, तसेच धारासुरमर्दिनी देवीची खणा-नारळाने ओटी भरून साकडे घालण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *