यवतमाळ : आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णाला चिकित्सालयात नेण्यापूर्वी योग्य ते उपचार मिळावेत आणि रुग्णाचा जीव वाचावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गाचे आयोजन २० एप्रिल या दिवशी आदर्शनगर येथील श्री. विष्णुपंत खाडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यामध्ये AB-CABS पडताळणी, रुग्णतपासणी, विजेचा धक्का बसणे, जळणे-भाजणे, प्राणीदंश, रस्त्यावरील अपघात इत्यादी विषयांवर कु. दीपाली चांदेकर आणि श्री. जयंत करोडदेव यांनी मार्गदर्शन केले आणि नंतर प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. या वेळी उपस्थितांकडून सराव करून घेण्यात आला. याचा लाभ १७ जिज्ञासूंनी घेतला.
यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग
Tags : Hindu Janajagruti Samiti