गेवराई (जिल्हा बीड) : येथील योग वेदांत समितीचे पदाधिकारी यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्हा समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. खाडये यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची दिशा, हिंदूसंघटनाची आवश्यकता, आपत्काळ म्हणजे काय ?, धर्मावरील आघातांविषयी समाजाचे प्रबोधन कसे करावे ? याविषयी मार्गदर्शन केले. या बैठकीतून प्रेरणा घेऊन सर्व पदाधिकारी यांनी दैनिक सनातन प्रभात प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, असे ठरवले.
विशेष !
१. उपस्थित पदाधिकार्यांनी धर्मावरील आघातांविषयी समितीच्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याचे आणि समितीच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे ठरवले.
२. विविध ठिकाणी छोट्या सभांचे आयोजन करण्याचे निश्चित केले.
३. आश्रमातील कार्यक्रमांत वेळोवेळी समितीने सहभागी व्हावे, अशी उपस्थितांनी इच्छा व्यक्त केली.
४. २९ एप्रिल या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी केलेले खंडण प्रसिद्ध झाले होते. ही माहिती असलेल्या अंकाच्या १ सहस्र ५०० प्रति पदाधिकार्यांनी घेतल्या.