Menu Close

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांना सादर केले निवेदन

ग्रामदैवत श्री अंबामाता आणि मंदिरे यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे नगरसेवक रफिक मुल्ला यांच्यावर कारवाई करावी : हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

हुपरी : ग्रामदैवत श्री अंबामाता आणि देवतांची मंदिरे यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे भाजपचे नगरसेवक आणि समाजकंटक रफिक मुल्ला यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन समस्त हिंदू आघाडीच्या वतीने साहाय्यक पोलीस निरीक्षक यांना २ मे या दिवशी देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरसेवक मुल्ला यांचा हिंदुत्वनिष्ठांनी जाहीर निषेध केला आहे.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अक्षय सरवदे, नीलेश पाटील, तुषार मालवेकर, सचिन माळी, प्रशांत सुतार, किशोर भोसले, सचिन गायकवाड, शिवदास माने, विनायक क्षीरसागर, सुजित देसाई, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. हुपरी परिसरातील आम्ही श्री अंबामातेचे भक्त आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी आहोत. भाजपचे नगरसेवक रफिक मुल्ला याने नगरपालिकेच्या मासिक सभेत ग्रामदैवत, पंचक्रोशीचे श्रद्धास्थान श्री अंबामाता आणि इतर देवतांची मंदिरे यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

२. समाजात अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे का ? याची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *