Menu Close

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील शोभायात्रेत रणरागिणी शाखेचा सहभाग

श्रीरामपूर : येथे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या श्रीमत् भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शहरातील श्री हनुमान मंदिरापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उंट, घोडे, विविध ढोल पथके सहभागी झाली होती, तसेच यामध्ये ऐतिहासिक देखावेही  होते. हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेचे पथकही या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शौर्य जागृत करणारी तलवार, दांडपट्टा, दंडसाखळी आणि लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके सादर करणारे रणरागिणी शाखेचे हे पथक विशेष लक्षवेधी ठरले. श्रीरामपूर शहर, नगर आणि नेवासे येथून आलेल्या २० हून अधिक रणरागिणी या पथकात सहभागी झाल्या होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *